पुणे : मंगळवार पेठेत भीषण आग ; बाजारपेठेतील सहा ते सात दुकानं जाळून खाक | पुढारी

पुणे : मंगळवार पेठेत भीषण आग ; बाजारपेठेतील सहा ते सात दुकानं जाळून खाक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात मंगळवार पेठ येथे जुन्या बाजारात पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आग एवढी भीषण होती की यामध्ये बाजारपेठेतील सहा ते सात दुकानं जाळून खाक झाली. अग्निशमन दलाची एकुण ०८ अग्निशमन वाहने (फायरगाडी व वॉटर टँकर) घटनास्थळी दाखल होऊन ०८•२४ वाजता आग आटोक्यात आणली गेली. आगीमध्ये स्थानिक दुकानदारांचं मोठं नुकसान झालं असून सध्या आता कुलिंगच काम सुरू आहे. पुण्यातल्या मंगळवार पेठ जुना बाजार या ठिकाणी दाट वस्तीमध्ये चार ते पाच दुकानांमध्ये  सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक धुराचा मोठा लोट पाहायला मिळाला.

मात्र काही वेळानंतरच आगीचे भीषण रूप हे रस्त्यावर  दिसू लागलं. या घटनेमुळे स्थानिक लोकांची चांगलीच तारांबळ उडाली असून आगीचं कारण अजूनही अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोहोचले. दाट वस्तीची जागा असल्यामुळे जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. मात्र आपलं कौशल्य दाखवत जवानांनी आग एका तासातच आटोक्यात आणली. या घटनेमुळे कोणालाही शारीरिक इजा झाल्याचे अजून माहिती पुढे आली नाही. मात्र पंचनामा आणि कुलिंग करण्याचं काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

 

 

Back to top button