

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार शहरातील 50 हून अधिक खासगी रुग्णालयांनी नोंदणी परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही. शहरातील 38 रुग्णालये बंद आहेत किंवा नोंदणीकृत पत्त्यावर अस्तित्वात नाहीत. परवान्यांचे लवकरात लवकर नूतनीकरण न केल्यास रुग्णालयांचे परवाने महिनाभरात रद्द केले जाणार आहेत, याबाबतच्या नोटिसाही रुग्णालयांना पाठवल्या आहेत.
बॉम्बे नर्सिंग होम कायद्यांतर्गत खासगी रुग्णालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे.
आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती म्हणाले, 'आम्ही सर्व रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांनी नोंदणीचे नूतनीकरण 30 दिवसांच्या आत करायचे आहे. बॉम्बे नर्सिंग होम कायद्यांतर्गत त्यांना 30 दिवसांची नोटीस दिली आहे.'