महाराष्ट्र केसरी किताबावर खेडची तिसर्‍यांदा मोहोर; बनकर पिता-पुत्रांनंतर शिवराजची पुरस्कारावर मोहोर

महाराष्ट्र केसरी किताबावर खेडची तिसर्‍यांदा मोहोर; बनकर पिता-पुत्रांनंतर शिवराजची पुरस्कारावर मोहोर

श्रीकांत बोरावके

आळंदी : खेड तालुका हा औद्योगिक व कृषी क्षेत्रातच अग्रेसर नसून तो कुस्ती क्षेत्रात देखील नावलौकिक मिळवत असल्याचे महाराष्ट्र केसरी लढतीतून अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्र केसरी किताबावर खेड तालुक्यातील कुस्तीगिरांनी तिसर्‍यांदा मोहोर उमटविली आहे. राक्षेवाडी गावचे शिवराज राक्षे हे महाराष्ट्र केसरी किताब पटकवणारे खेड तालुक्यातील तिसरे मल्ल ठरले आहेत.

चिंबळी गावचे सुपुत्र दिवंगत पैलवान हिरामण तयाजी बनकर हे महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे खेड तालुक्यातील पहिले पैलवान ठरले. त्यांनी अकलूज येथे सन 1976 साली झालेल्या स्पर्धेत हा किताब मिळविला होता. त्यानंतर त्यांचे सुपुत्र खेड तालुक्यातील दुसरे महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी ठरलेले पैलवान विकी ऊर्फ विजय हिरामण बनकर हे हा किताब पटकावणारे खेड तालुक्यातील दुसरे मल्ल ठरले.

विकी बनकर यांनी पिंपरी चिंचवड – सांगवी येथे सन 2009 साली झालेल्या स्पर्धेत हा किताब मिळविला होता.
शिवराज राक्षेच्या रूपाने आता खेड तालुक्याला तिसर्‍यांदा हा किताब मिळाल्याचे चिंबळी येथील कुस्तीशौकीन नवनाथ बटवाल यांनी सांगितले. ही बाब तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. खेड तालुक्याने तिसर्‍यांदा ही कामगिरी केल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news