सर्वाधिक मतदार संख्या चिंचवडमध्ये; शहरातील एकूण मतदार 9 लाख 46 हजार 958
पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात चिंचवड मतदारसंघात सर्वांधिक 5 लाख 66 हजार 415 मतदार असल्याने तो सर्वांत मोठा मतदारसंघ ठरला आहे. शहरात एकूण 14 लाख 46 हजार 958 मतदार आहेत. गेल्या वर्षी 31 मे रोजी विधानसभानिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या वेळी एकूण मतदारसंख्या 15 लाख 693 होती. मात्र, दुबार, मयत, स्थलांतरण, बोगस यादी कारणांमुळे तब्बल 53 हजार 735 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे यंदा मतदार संख्या घटली आहे.
शहरात एकूण 24 लाख 46 हजार 985 मतदार आहेत. त्यात 7 लाख 73 हजार 111 पुरुष मतदार आणि 6 लाख 64 हजार 232 महिला मतदार आहेत. एकूण 140 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदार यादीत नागरिकांना आपले नाव ुुु.र्पीीिं.ळप आणि ुुु. लशे. ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर पाहता येईल. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी तयार केली जाईल. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार संख्या स्पष्ट होईल.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार संख्या
मतदार संघ एकूण पुरुष महिला तृतीयपंथी
चिंचवड 5 लाख 66 हजार 415 3 लाख 1 हजार 648 2 लाख 64 हजार 732 35
भोसरी 5 लाख 13 हजार 761 2 लाख 82 हजार 864 2 लाख 30 हजार 912 85
पिंपरी 3 लाख 57 हजार 207 1 लाख 88 हजार 599 1 लाख 68 हजार 588 20
भोर (ताथवडे) 9 हजार 575 – – –
एकूण 14 लाख 46 हजार 958