खेडशिवापुर टोलनाक्यावर तब्बल आठ किलो गांजा पकडला; राजगड पोलिसांची दमदार कामगिरी | पुढारी

खेडशिवापुर टोलनाक्यावर तब्बल आठ किलो गांजा पकडला; राजगड पोलिसांची दमदार कामगिरी

खेड शिवापूर/नसरापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये सध्या चोरी चोरी चुपके चुपके गांजा व अफू विक्रीचे प्रमाण वाढत असून खेड शिवापुर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी संशयत कार थांबवून गांजा पकडला असून कारमधील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पकडलेला गांजा ८ किलो असून पुढील कारवाई सुरू आहे.

खेड शिवापुर टोलनाका ( ता. हवेली) येथील पुणे बाजाकडून येणारी भरधाव कार (एच आर 51 बि. सी. 2424) ही सातारा बाजूकडे जात असताना राजगड पोलिसांचे वाहतूक विभाग नियत्रंणचे पोलीस हवालदार सचिन कदम, पोलीस कॉन्स्टेबल निलेश व्होवाळ, अमोल सूर्यवंशी, होमगार्ड पंकज शिंदे यांनी संशयित कार थांबविली. कारची तपासणी केली असता मागील डिकीत गांजा आढळला. यातील पाच आरोपींना पडकले असून त्यांची नावे समजू शकली नाही.

खेड शिवापूर टोलनाका येथे सोमवार ( दि. १६ ) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गांजा पडकलेली कार व आरोपींना घेऊन खेडशिवापूर चौकीत आणण्यात आले असून पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, हे आरोपीची कसून चौकशी करत आहे. गांजा विकणारी टोळी महामार्गावर सक्रिय झाल्याचे अनेकवेळा दिसून येत आहे. आजच्या घटनेतील मुख्य सूत्रधार कोण याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.

Back to top button