पिंपरी : ‘निओ मेट्रो’चा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात

पिंपरी : ‘निओ मेट्रो’चा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एचसीएमटीआर (हाय कॅपॅसिटी मास टॉन्झीस्ट रूट-रिंग रोड) आणि भोसरी ते चाकण मार्गावर निओ मेट्रो डीपीआर तयार करून घेण्यात आला आहे. या महत्वाकांक्षी खर्चिक प्रकल्पाचा निर्णय राज्य शासन घेईल, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी  स्पष्ट केले. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) पिंपरी-चिंचवड शहरातील 31.40 किलोमीटर अंतराचा वर्तुळाकार मार्ग असलेल्या 'एचसीएमटीआर'चा सुधारित आराखडा आयुक्त शेखर सिंह यांच्यासमोर सादर केला.  तसेच, इंद्रायणीनगर, भोसरी येथील डिस्ट्रीक्ट सेंटर ते चाकण या 16.11 किलोमीटर अंतरचा निओ मेट्रोचा सुधारित डीपीआरही सादर केला. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या संदर्भात विचारले असता ते  बोलत होते.

आयुक्त सिंह म्हणाले की, महामेट्रोच्या अधिकार्‍यांनी या पूर्वी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर आणि राजेश पाटील यांच्यासमोर दोन्ही डीपीआर सादर केले आहेत. त्याप्रमाणे त्यांनी माझ्यासमोर ते डीपीआर सादर केले. त्याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यात दोन्ही मार्गासाठी निओ मेट्रोचा पर्याय निश्चित करण्यात आला आहे. मात्र, महत्वाकांक्षी व मोठ्या खर्चाचा प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी आवश्यक आहे. शासनाने निर्णय घेऊन त्यास मंजुरी दिल्यानंतर महापालिका त्याबाबत पुढाकार घेईल, असे त्यांनी  स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news