पुणे : चीनसह काही देशांमध्ये कोरोनाने चिंता वाढवली असली, तरी सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. सध्या 141 सक्रिय रुग्ण असून, दररोज सरासरी 9 ते 15 रुग्णांचे निदान होत आहे. पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 55 इतकी आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोव्हिड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 24 डिसेंबरपासून पुणे, मुंबई आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
24 डिसेंबर ते 14 जानेवारीदरम्यान 3 लाख 72 हजार 506 प्रवासी आले असून, 8471 प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 21 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यामध्ये मुंबई (4), पुणे (3), नवी मुंबई, अमरावती आणि सांगलीतील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. इतर रुग्ण बाहेरच्या राज्यांतील आहेत. पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 55 इतकी आहे. गेल्या आठवड्याभरात शहरात 9 आणि 14 जानेवारी रोजी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही.