पुणे : दोन दिवस राहणार कडाक्याची थंडी; हवामान विभागाचा अंदाज | पुढारी

पुणे : दोन दिवस राहणार कडाक्याची थंडी; हवामान विभागाचा अंदाज

पुणे : आगामी पाच दिवस संपूर्ण देशात पुन्हा खराब हवामान राहणार असून, दोन दिवस कडाक्याची थंडी राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राजस्थानात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, हिमालयात पश्चिमी चक्रवात तीव्र झाल्याने देशात पुन्हा पाच दिवस दाट धुके, बहुतांश भागात पाऊस, असे विचित्र वातावरण राहणार आहे.

15 व 16 रोजी उत्तर भारतात थंडीचा कडाका राहील, त्यामुळे महराष्ट्रातही दोन दिवस थंडीचा जोर राहील, असा अंदाज आहे. त्यानंतर मात्र देशातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. त्यामुळे राज्यात 17 ते 20 जानेवारी या कालावधीत काही भागांत हलका पाऊस होऊ शकतो. तसेच, बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Back to top button