

पिंपळे गुरव : सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्र ते स्पायसर कॉलेज दरम्यान रस्त्यावर रोजच्या अनेक अडचणींना सध्या स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. रोजच या रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनाची नित्य ये-जा सुरू असताना या अरुंद रस्त्यावर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. वाहनाचे कर्णकर्कश हॉर्नचा आवाज आणि संभावित होणारा अपघाती धोका अशा परीस्थितीमुळे स्थनिकांना हा रस्ताच डोकेदुखी ठरत आहे.
सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्र ते स्पायसर कॉलेजदरम्यान रस्ता दुतर्फा हॉस्पिटल, शाळा, क्लासेस असल्यामुळे सकाळी संध्याकाळी वेळेस ज्येष्ठ नागरिक, लहान शाळकरी मुलांना रस्ता भरधाव वाहतूक कोंडीमुळे ओलांडता येत नाही. एकसारखा होणारा
हॉर्नचा आवाज, अवजड वाहतूक कोंडीमुळे अपघाती धोका निर्माण होत असल्याने वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांतून केली जात आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र ते स्पायसर कॉलेजदरम्यान रस्त्यावर अवजड डंपर वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास, वाहनचालकांच्या सतत हॉर्न वाजवण्याचा त्रास येथील स्थानिक नागरिकांना होतो. वाहतूक विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. लहान मुलांना विशेषतः ज्येष्ठांना मात्र रस्तादेखील ओलांडता येत नाही.
– राजाराम चोपडे, अशोक चव्हाण, (स्थानिक जेष्ठ नागरिक)या रस्त्यावर अवजड वाहनाची गर्दी सर्रास पाहायला मिळते. या रस्त्यावर दुतर्फा शाळा, क्लासेस आहेत. रोजच होणार्या वाहतूक कोंडीचा त्रास होतो. रस्ता वन-वे करणे गरजेचे आहे. हलक्या वाहनांना वाहतुकीला प्रवेश मिळावा. वाहतूक विभागाने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– कैलास बनसोडे, हुमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनबँक ऑफ महाराष्ट्र ते स्पायसर कॉलेजदरम्यान रस्त्यावर पालक, स्थानिक वर्गाचे गाड्यांचे पार्किंग असते. तसेच सद्यस्थितीत वाहतूक विभागाकडे पोलिस कर्मचार्यांची संख्या अपुरी आहे. या रस्स्यावर पेट्रोलिंग करण्याकरिता पोलिस कर्मचारी पाठवले जातात. वाहतूक कोेंडीस जबाबदार ठरणार्या रस्त्यावरील अवजड वाहनांवर कारवाई केली जाईल.
– प्रसाद गोकुळे, पोलिस निरीक्षक, सांगवी(वाहतूक)