देऊळगाव राजे : जाणता राजा म्हणवणार्‍यांनी विदर्भातील शेतीसिंचन 8 टक्क्यांवर ठेवलं | पुढारी

देऊळगाव राजे : जाणता राजा म्हणवणार्‍यांनी विदर्भातील शेतीसिंचन 8 टक्क्यांवर ठेवलं

देऊळगाव राजे; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांचे उत्पादन वाढले पण उत्पन्न वाढले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आणल्या आहेत. जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी विदर्भातील शेती सिंचन 8 टक्क्यांवर ठेवलं. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतोय, असा स्पष्ट आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला. ते दौंड कृषी महोत्सव 23 च्या कृषिभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाला किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चाहर, आमदार राम शिंदे, मकरंद कोरडे, बाळासाहेब गावडे, संतोष तापकीर, दिलीप देशमुख, सीमा चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकप्रसंगी वासुदेव काळे म्हणाले, राज्यातील व केंद्रातील सरकारच्या योजना सामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्याचे काम कृषी प्रदर्शनातून केले जात आहे. केंद्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष राजकुमार चाहर म्हणाले, 10 वर्षे स्वामिनाथन आयोगाची शिफारशी काँग्रेस सरकारने लागू केली नाही. नरेंद्र मोदींनी सत्तेवर येताच त्या लागू केल्या.

कृषी क्षेत्राचे बजेट 23 हजार कोटींवरून 135 कोटींवर नेले. कृषिभूषण पुरस्कार मानकरी : धनंजय सोमनाथ आटोळे राजेगाव (60 एकरावर एकात्मिक शेती), तुकाराम नारायण कतुरे, विकास सर्जेराव चोरमोले (110 टन उत्पादन), लक्ष्मण चोरमले, संजय भिकू पिलाने, मुरलीधर पंढरीनाथ झेंडे, अरविंद भीमराव तावरे, चंद्रभागा महादेव काळे (ड्रॅगन फ्रुट), नारायण चिलू खराडे, दीपक आबासो गुरगुडे, श्रीरंग पार्वती कोंढाळकर आणि लक्ष्मण दिनकर भोसले.

Back to top button