छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे अनावरण; न्यू कोपरे गावाच्या वैभवात भर | पुढारी

छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे अनावरण; न्यू कोपरे गावाच्या वैभवात भर

वारजे; पुढारी वृत्तसेवा : न्यू कोपरे गावामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा नुकताच पार पडला. या स्मारकामुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे. आमदार भीमराव तापकीर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी अभिषेक, ह. भ. प. रोहिदास महाराज हांडे यांची कीर्तन झाले. किरण देशमुख यांचा पोवाडा व शिवगीतांच्या कार्यक्रमाचे देखील या वेळी आयोजन केले होते.

स्मारकासाठी मेहनत घेणार्‍या कारागिरांचा या वेळी सन्मान करण्यात आला. या वेळी येसाजी कंक यांचे थेट वंशज सिद्धार्थ कंक, माजी उपमहापौर दिलीप बराटे, भगवान मोरे, शुक्राचार्य वांजळे, माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, माजी नगरसेवक सचिन दोडके, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदिप धुमाळ, भारतभूषण बराटे, सचिन विष्णू दांगट, त्रिंबक मोकाशी, विकास दांगट, प्रवीण शिंदे, अतुल दांगट, नितीन धावडे, सुरेश धावडे, सचिन मोरे, सुरेश गुजर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यू कोपरे ग्रामस्थ, छत्रपती श्री शिवाजी तरुण मंडळ, अध्यक्ष पांडुरंग मोरे, माजी उपसरपंच मनिषा मोरे, रमेश मोरे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. न्यू कोपरे हे गाव ऐतिहासिक असून, या गावात महापुरुषांची स्मारके आहेत. या गावात सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यात येत असून, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि आचारविचार यातून नव्या पिढीस सातत्याने प्रेरणा देण्यासाठी या स्मारकाची उभारणी करण्यात आली असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

Back to top button