पुणे : 50 लाखाच्या खंडणीसाठी तिघांचे अपहरण; तिघे जेरबंद | पुढारी

पुणे : 50 लाखाच्या खंडणीसाठी तिघांचे अपहरण; तिघे जेरबंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पन्नास लाखांच्या खंडणीसाठी मार्केटयार्ड येथून तिघांचे अपहरण करणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नगर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने काही तासांत जेरबंद केले. श्रीगोंदा येथून तीन आरोपींना ताब्यात घेतले असून अपहरण मागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. ताब्यात घेतलेली तिघे आरोपी नगर जिल्ह्यातील आहेत. प्रवीण शिर्के, विजय खराडे, विशाल मदने (रा. नगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्याची नावे आहेत.

Back to top button