पुण्यात एमपीएसीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन; या मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर | पुढारी

पुण्यात एमपीएसीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन; या मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर

पुणे; पुढारी ऑनलाईन डेस्क : आज राज्यभर MPSC चा अभ्यास करणारे विध्यार्थी आंदोलन करत आहेत. त्या अनुषंगाने पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएसीच्या विध्यार्थ्यानी आंदोलन केले. यावेळी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून पुण्याच्या जवळच्या गावातील विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांसह युवक कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी देखील सहभागी झाले असून या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत.अनेक वर्षांपासून पुण्यात आणि अन्य शहरात एमपीएसीचे विद्यार्थी सध्याच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करत आहेत. कोरोनामुळे गेले दोन वर्ष विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

नवा पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. तसेच नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा, अभ्यास करण्यासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा, नवीन अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रमावार आधारित असल्यामुळे त्याची पुस्तके देखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी यावेळी सरकारकडे केल्या आहेत.

Back to top button