Latest
जळगावचा पारा 7 अंशांवर; सलग पाचव्या दिवशी नीच्चांकी
पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम असून गुरुवारी जळगावचा पारा 7 अंशांवर असून सलग पाचव्या दिवशी नीच्चांकी ठरला आहे. गेल्या पाच दिवसांपासून उत्तर भारतात थंडी व दाट धुके असून शीत ओलहरी त्या भागातून महाराष्ट्रात येत आहेत.
त्याचा परिणाम म्हणून सलग पाचव्या दिवशी जळगावचे किमान तापमान नीच्चांकी ठरले असून गुरुवारी 7 अंशांवर होते. त्या पाठोपाठ पुण्याचा पारा 8.3 अंशांवर खाली गेला. औरंगाबाद 9.4, नाशिक 9.2, नागपूर 11 अंश इतके तापमान होते. असे वातावरण 14 जानेवारीपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

