मंचर : नदीपात्रात बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला | पुढारी

मंचर : नदीपात्रात बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : चास येथे घोड नदीपात्रात बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह 72 तासांनंतर गुरुवारी (दि.12) पहाटे सापडला. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. साईप्रसाद बालमालकोंडाया वेण्णापुसा (वय 18, रा. हिवरे तर्फे नारायणगाव ता. जुन्नर, मूळ रा. आंध्र प्रदेश) हा वाढदिवस असल्याने दोन मित्रांबरोबर चास येथे फिरण्यासाठी आला होता.

चास येथे घोड नदीपात्रात असलेले रांजणखळग्यांचे सेल्फी फोटो काढत असताना सोमवारी (दि.9) सकाळी 11 वाजता साईप्रसादचा पाय घसरून तो कुंडातील रांजणखळग्यांमध्ये बुडाला होता. त्यानंतर गेले 3 दिवस त्याचे शोध कार्य चालू होते. मात्र, गुरुवारी पहाटे 6 वाजता त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळी येत नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.

Back to top button