पुणे : मोठी बातमी ! कोयता गॅंगच्या प्रमुख सदस्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या | पुढारी

पुणे : मोठी बातमी ! कोयता गॅंगच्या प्रमुख सदस्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढारी ऑनलाईन डेस्क :  सध्या पुण्यात चर्चेत असलेलं नाव म्हणजे कोयता गॅंग. हातात कोयते नाचवत दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीने नागरिकांना त्रास देण्याचा सपाटा सुरू केला होता.  कोयता टोळीचा प्रमुख सुजित वर्माचा याचा येत्या 21 तारखेला स्मृतिदिन आहे. कोयता टोळी याच दिवशी शहरात अनेक भागांमध्ये धुमाकूळ घालणार होती. याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाला मिळाल्यानंतर, शहरातील मांजरी भेकराई ,गंगानगर, फुरसुंगी आणि इतर भागांमध्ये काल रात्री छापेमारी करत कोणत्या टोळीचा प्रमुख सदस्य असलेला आकाश कांबळे यांच्यासह तीन साथीदारांना गुन्हे शाखेच्या ६ ने अटक केली आहे.

कालच राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी कोयता टोळीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे पोलीस दल सध्या कोयता टोळीच्या विरोधात मोहीम राबवत कारवाई करत आहे. काल मध्यरात्रीपर्यंत छापेमारी करून कोयता टोळीचा जहाल सदस्य आणि अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे

Back to top button