तळेगावात कोबीचे पीक जोमात | पुढारी

तळेगावात कोबीचे पीक जोमात

तळेगाव स्टेशन :  पुढारी वृत्तसेवा : तळेगाव स्टेशन परिसरातील शेतांमध्ये कोबीचे पीक जोमात आले आहे. परिसरात तांदूळ, गहू, ऊस, भेेंडी आणि फूलशेतीही केली जाते. तसेच कोबीचेही पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकाची रोपे लावली जात असून, या पिकांचे उत्पन्न साधारण दोन महिन्यांत येते. व्यवस्थित निगा राखली तर दोन महिन्यांत पाण्याचा, खताचा, खुरपणीचा, फवारणीचा खर्च जाऊन एकरी एक लाखाच्या आसपास उत्पन्न मिळते.

कोबीची रोपे लावल्यानंतर दर 8 दिवसांनी पाणी द्यावे लागते. रोपांची लागण केल्यानंतर साधारण 8 दिवसांनी खुरपणी करावी लागते. पीक निघेपर्यंत दोन वेळा तरी खुरपणी करावी लागते. खुरपणी झाली की खत टाकणे आवश्यक असते. कीटकनाशकाची फवारणी मात्र दर आठ दिवसांनी पीक निघेपर्यंत करावी लागते, अशी माहिती ‘पुढारी’शी बोलताना शेतकरी रोहित रजपूत यांनी दिली. या वेळी रजपूत यांनी असेही सांगितले की, धान्यांच्या पिकाची तसेच फळांची चोरी होण्याची शक्यता असते, तशी कोबीच्या पिकाची चोरी होण्याची शक्यता कमी असते.

हे आहेत कोबीचे फायदे
कोबीत अ आणि क जीवनसत्त्व जास्त आहे.
तुम्हाला तुमची भूक क्षमवायची असेल आणि वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही कोबी खाच.
100 ग्रॅम कोबीत 25 कॅलरीज असतात. कोबी हा फायबरयुक्त असतो. त्यामुळे लगेच भूक लागत नाही.
कोबीमध्ये उच्च जीवनसत्त्वे असल्याने ते आरोग्यवर्धक आहे.
कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो. कॅन्सर होण्यापासून कोबी मदत करतो.
कफापासून सुटका
कफ होण्यापासून सुटका कोबी करतो. कोबी खाल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चागले राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही, त्यामुळे अनेक आजारांतून सुटका होते.

Back to top button