पुणे विभागात 771 वीजचोर्‍या उघडकीस | पुढारी

पुणे विभागात 771 वीजचोर्‍या उघडकीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागाने डिसेंबरमध्ये वीजचोरीची 771 प्रकरणे व अनधिकृत वीजवापराची 238 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. मागील महिन्यात वीजचोरीविरुद्ध कडक मोहीम राबविण्यात आली. 7 हजार 404 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात 2 कोटी 55 लाख रुपयांची एकूण 771 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली, तर 81 लाख 23 हजार रुपयांची 238 अनधिकृत वीजवापराची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

यात एकूण 417 प्रकरणांत 149 लाख रुपये वसूल करण्यात आलेले आहेत. पुणे परिमंडळात एकूण दोन हजार 962 वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीजवापराची 144 प्रकरणे व वीजचोरीची 272 प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. वीजचोरीविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत.

Back to top button