राज्यात थंडीची लाट कायम; आठ ते दहा दिवस कडाक्याची थंडी | पुढारी

राज्यात थंडीची लाट कायम; आठ ते दहा दिवस कडाक्याची थंडी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम असून, पुढील आठ ते दहा दिवस कडाक्याची थंडी राहणार आहे. किमान तापमानात थोडासा चढ-उतार राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सलग तिसर्‍या दिवशी राज्यात जळगाव शहराचे तापमान नीचांकी नोंदले असून, तेथे तापमानाचा पारा 7.5 अंशांवर पोहोचला आहे. पुण्यातील किमान तापमान 8.1 अंश सेल्सिअस होते.

काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई तसेच कोकणात थंडी वाढली आहे. विदर्भ व उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत तसेच परभणी, गोंदिया, अकोला, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतही थंडीचा कडका कायम आहे.

पुणे, सातारा, सांगली, महाबळेश्वर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतही किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश शहरांत सकाळी दाट धुके पडणार आहे. तसेच पुढील आठ ते दहा दिवस थंडीची लाट राहणार आहे.

Back to top button