नारायणगाव : विघ्नहर मंदिर कळसांना सोन्याचा मुलामा

नारायणगाव : विघ्नहर मंदिर कळसांना सोन्याचा मुलामा

नारायणगाव(ता. जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र ओझर येथील पेशवेकालीन मंदिरावर असणार्‍या सात कळसांना सोन्याचा मुलामा देण्यात आला. धार्मिक विधी करून श्रीविघ्नहराच्या मंदिरावर कळस बसविण्यात आले, अशी माहिती श्रीविघ्नहर गणपती देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली. चिमाजी अप्पांनी नवसपूर्तीनंतर मंदिराचा जीर्णोद्धार केला. ग्रामस्थांच्या मदतीने अप्पा शास्त्री जोशी यांनी मंदिर शिखराचा जीर्णोद्धार केला.

त्यानंतर श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या संमतीने शिखरावरील कळसांना सोन्याचा मुलामा चढविण्यात आला. एकूण अकरा तोळे सोने यासाठी लागले, असे कवडे यांनी सांगितले. भाविक नोटा, नाणी, सोन्या, चांदीच्या दुर्वा श्रीविघ्नहरास अर्पण करीत असतात. त्यातील रोख रक्कम बँकेत भरली जाते.

सोन्या,चांदीच्या दुर्वांचे विघटन करून त्यातून हे काम करण्यात आले आहे. याप्रसंगी देवस्थानचे सचिव दशरथ माडे, विश्वस्त रंगनाथ रवळे, किशोर कवडे, मंगेश मांडे, आनंदराव मांडे, गणपत कवडे, ओझरच्या सरपंच मथुरा कवडे, तारामती कर्डक, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप कवडे, दत्तात्रय कवडे, महेश कवडे, संतोष मांडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news