इंदापूर: गोतोंडी अपघातात मोटारसायकल स्वाराचा मृत्यू | पुढारी

इंदापूर: गोतोंडी अपघातात मोटारसायकल स्वाराचा मृत्यू

शेळगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील गोतोंडी (ता. इंदापूर) येथे मोटारसायकल व अवजड वाहनाच्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. मारुती ज्ञानदेव शिरसट (वय ५०, रा. शिरसटवाडी, ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ९) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मारुती शिरसट हे मोटारसायकलने (MH 12 FM 2921) बारामतीकडून इंदापूरकडे जात होते. यावेळी बारामतीकडून इंदापूरकडे चाललेले अवजड वाहन (MH 12 kp 9635) यांच्यामध्ये गोतोंडी येथे अपघात झाला. या अपघातात मारुती शिरसट यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त अवजड वाहन हे नजीकच्या वडापुरे पेट्रोल पंपावर सोडून चालक फरार झाला आहे. घटनास्थळी वालचंदनगर पोलिस स्टेशनचे दादासाहेब डोइफोडे यांनी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळी सरपंच गुरूनाथ नलवडे, आप्पा पाटील, सागर भोसले, हरिभाऊ खाडे रवी कांबळे यांनी मदतकार्य केले.

Back to top button