पुणे : मासळीच्या भावात तेजी; थंडीमुळे मागणी वाढली | पुढारी

पुणे : मासळीच्या भावात तेजी; थंडीमुळे मागणी वाढली

पुणे : थंडीमुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे थंडीमुळे ग्राहकांकडून मासळीला मागणी वाढली आहे. बाजारात त्यातुलनेत आवक होत नसल्याने खोल समुद्रातील आणि खाडीच्या मासळीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, आंध्रप्रदेश आणि नदीतील मासळीचे दर स्थिर होते. गेल्या आठवड्यातील मटण, चिकन, अंड्याचे दर स्थिर होते.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 8) खोल समुद्रातील मासळीची 10 ते 15 टन, खाडीची 200 ते 250 किलो, तर नदीच्या मासळीची 200 ते 400 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 14 ते 15 टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)- पापलेट : कापरी : 1400-1600, मोठे : 1500-1600, मध्यम : 1200-1300, लहान : 900-1000, भिला : 600-700, हलवा : 550-700, सुरमई : 440-550, रावस : 600-700, घोळ : 700-800, करली : 300-360, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 360-400, पाला : 1000- 1400, वाम : 700-800, ओले बोंबील : 200-300. कोळंबी : लहान 180-280, मोठी : 360-550, जम्बोप्रॉन्स : 1400-1500, किंगप्रॉन्स : 750-800, लॉबस्टर : 1800- 2000,

राणीमासा : 200-240, खेकडे : 280-320, चिंबोर्या : 550-600. खाडीची मासळी : सौंदाळे : 280-320, खापी : 240-280, बांगडा : 120-160, शेवटे : 240-280, पेडवी : 120, बेळुंजी : 140-160, खुबे : 120-140, तिसर्या – 240-300, तारली : 120-140. नदीतील मासळी : रहू : 140-160, कतला : 140-160, मरळ : 400-440, शिवडा : 240-280, खवली : 240-280, आम्ळी : 120-160, खेकडे : 360-400, वाम : 500-550. मटण : बोकडाचे : 700, बोलाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 220, लेगपीस : 270, जिवंत कोंबडी : 150, बोनलेस : 320. अंडी : गावरान (शेकडा) 950, डझन 126, प्रतिनग 10.50. इंग्लिश (शेकडा) 593, डझन 78, प्रतिनग 6.50.

Back to top button