पुणे : वांगी, भेंडी, ढोबळी मिरची महागली; थंडीमुळे फळभाज्यांच्या उत्पादनात घट

पुणे : वांगी, भेंडी, ढोबळी मिरची महागली; थंडीमुळे फळभाज्यांच्या उत्पादनात घट
Published on
Updated on

पुणे : राज्याच्या विविध भागात पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम वांगी, भेंडी व ढोबळी मिरचीच्या उत्पादनावर झाला आहे. थंडीमुळे या फळभाज्यांची बाजारातील आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी अधिक असल्याने भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांची आवक-जावक कायम असल्याने दर स्थिर राहिले.

कांदापात, करडई, पुदिना, मुळा स्वस्त
रविवारी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात पुणे विभागातून कोथिंबीरीची 1 लाख 25 हजार व मेथीची 70 हजार जुडींची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक स्थिर राहिली तर मेथी आवक 30 हजार जुड्यांनी घटली. आवकेसह मागणीही कमी राहिल्याने मेथीचे भाव स्थिर राहिले. तर, मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने करडई, पुदिना व मुळ्याच्या भावात गड्डीमागे 5 रुपयांनी वाढ झाली. कांदापातीच्या भावात 10 रुपयांनी वाढ झाली. उर्वरित सर्व पालेभाज्यांची आवक-जावक कायम असल्याने भाव टिकून होते. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव 3 ते 15 रुपये तर किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपये इतके राहिले.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. 8) पुणे विभागासह राज्य तसेच परराज्यातून 100 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर राहिली. परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये बेंगलोर येथून 3 टेम्पो आले तर गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, 150 क्रेटस् तोतापुरी कैरी, कर्नाटक व गुजरात येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, राजस्थान येथून 9 ते 10 ट्रक गाजर, मध्य प्रदेश व पंजाब येथून 28 ते 30 ट्रक वाटाणा तर मध्य प्रदेशातून लसणाची 8 ते 10 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1100 ते 1200 पोती, टोमॅटो 11 ते 12 हजार क्रेटस्, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, गवार 6 ते 7 टेम्पो, भेंडी 6 ते 7 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा 125 ट्रक यांसह आग्रा, इंदौर व स्थानिक भागातून बटाट्याची 50 ट्रक इतकी आवक झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news