चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा व लसणाच्या आवकेत वाढ झाली. वाटाणा, बटाटा व फ्लॉवरचे भाव या आठवड्यात वधारले. कोबी, फ्लॉवर, वांगी व भेंडीच्या आवकेत वाढ झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथीची भरपूर आवक होऊनही भाव तेजीत राहिले. जनावरांच्या बाजारात जर्शी गायी, बैल व म्हशींच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल 3 कोटी 80 लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक 2,750 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1,000 क्विंटलने वाढल्याने भावात 100 रुपयांची घसरण झाली. कांद्याचा कमाल भाव 2 हजार 100 रुपयांवरून 2 हजार रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1 हजार 600 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने वाढून भावात 100 रुपयांची वाढ झाली.
बटाट्याचा कमाल भाव 1 हजार 700 रुपयांवरून 1 हजार 800 रुपयांवर पोहचला. बंदूक व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 5 क्विंटलने वाढून कमाल भाव 5 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 280 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 15 क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला 2 हजार 500 ते 3 हजार 500 रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा : एकूण आवक 2,750 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,000 रुपये, भाव क्रमांक 2. 1,500 रुपये, भाव क्रमांक 3. 1,300 रुपये.
बटाटा : एकूण आवक 1,600 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,800 रुपये, भाव क्रमांक 2. 1,500 रुपये, भाव क्रमांक 3. 1,300 रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे :
टोमॅटो – 330 क्विंटल ( 600 ते 1,000 रु. ), कोबी – 210 क्विंटल (300 ते 500 रु.), फ्लॉवर – 214 क्विंटल (500 ते 800 रु.), वांगी – 83 क्विंटल ( 1,000 ते 2,000 रु.), भेंडी – 82 क्विंटल (3,000 ते 4,000 रु.), दोडका – 54 क्विंटल (3,000 ते 4,000 रु.), कारली – 78 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), दुधीभोपळा – 63 क्विंटल (1,500 ते 2,500 रु.), काकडी – 72 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), फरशी – 46 क्विंटल (1,500 ते 2,500 रु.), वालवड – 74 क्विंटल (2,000 ते 4,000 रुपये), गवार – 52 क्विंटल (4,000 ते 7,000 रु.), ढोबळी मिरची – 112 क्विंटल (2,000 ते 4,000 रु.), चवळी – 42 क्विंटल (1,500 ते 2,500 रुपये.), वाटाणा – 525 क्विंटल (2,000 ते 2,400 रु.), शेवगा – 10 क्विंटल (7,000 ते 9,000 रु.), गाजर – 225 क्विंटल (1,200 ते 1,800 रु.).
पालेभाज्या : चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी : एकूण 16 हजार 950 जुड्या (800 ते 1,000 रु.), कोथिंबीर – एकूण 28 हजार 540 जुड्या (600 ते 800 रु.), शेपू – एकूण 8 हजार 950 जुड्या (500 ते 700 रु.), पालक – एकूण 4 हजार 200 जुड्या (400 ते 500 रु.)
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 60 जर्शी गायींपैकी 45 गायींची विक्री झाली. (15,000 ते 60,000 रु.), 215 बैलांपैकी 160 बैलांची विक्री झाली (10,000 ते 35,000 रु.), चाकणला विकीसाठी आलेल्या 207 म्हशींपैकी 188 म्हशींची विक्री झाली. म्हशीला 25 हजार ते 80 हजार रुपये भाव मिळाला. शेळ्या- मेंढ्यांची संख्या वाढली असून, विक्रीसाठी आलेल्या 9,140 शेळ्यांपैकी 8,590 शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना 2 हजार रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.