महाराष्ट्र गारठला; पुणे @ 13.4; आगामी 48 तास कडाक्याच्या थंडीचे | पुढारी

महाराष्ट्र गारठला; पुणे @ 13.4; आगामी 48 तास कडाक्याच्या थंडीचे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्यामुळे पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेशपर्यंत सर्व राज्ये गारठली असून महाराष्ट्रही गारठण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी गोंदियाचे तापमान रविवारी 6.8 अंशावर होते. आगामी 48 तासांत महाराष्ट्र आणखी गारठणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ढगाळ वातावरणामुळे थंडी पडली नव्हती.

मात्र जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात मात्र कडाक्याच्या थंडीचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारत थंडीने गारठला असून त्या भागात दाट धुके व कडाक्याची थंडी आहे. त्या भागातून शीतलहरी महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी गोंदिया 6.8, नागपूर 8, औरंगाबाद 9.4 तर पुणे 13.4 अंशावर होते.

उत्तर भारताला ’रेड अलर्ट’

महाराष्ट्राचे किमान तापमान चार ते पाच अंशाने कमी झाली आहे. पश्चिमी चक्रवात उत्तर भारतात आणखी तीव—तेने सक्रिय झाल्यामुळे पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, व मध्य प्रदेश या राज्यांना थंडीचा रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. त्यामुळे त्या भागात नागरिकांना सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील या वातावरणाचा परिणाम होणार असून किमान तापमानात आणखी चार ते पाच अंशाने घट होईल, असा अंदाज रविवारी हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी दिला आहे.

Back to top button