मोठी बातमी ! दहा-पंधरा दिवसांत कोव्होव्हॅक्सला बुस्टर म्हणून मान्यता मिळेल : आदर पुनावाला | पुढारी

मोठी बातमी ! दहा-पंधरा दिवसांत कोव्होव्हॅक्सला बुस्टर म्हणून मान्यता मिळेल : आदर पुनावाला

प्रज्ञा केळकर-सिंग :

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटच्या विरोधात कोव्होव्हॅक्स लसीची परिणामकारकता कोव्हीशिल्डच्या तुलनेत जास्त आहे. पुढील दहा-पंधरा दिवसांत कोव्होव्हॅक्स लसीला बुस्टर म्हणून मान्यता मिळेल, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ‘पुढारी’ प्रतिनिधीशी बोलताना दिली. सध्या कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन बंद आहे, असेही ते म्हणाले.

भारती विद्यापीठाच्या भारती सुपर स्पेशालिटी आणि स्टुडंट हाऊसिंग कॉम्प्लेक्सचे उदघाटन रविवारी झाले. सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अदर पुनावाला यांना पहिल्या डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्यक्रमानंतर ‘पुढारी’ प्रतिनिधीशी संवाद साधताना त्यांनी लसीबाबत भाष्य केले.

सध्या नागरिकांना कोव्हीशिल्ड लस उपलब्ध होत नसल्याबद्दल विचारले असता पुनावाला म्हणाले, ‘केंद्र सरकारकडे कोव्हीशिल्ड लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तूर्तास लसीचे उत्पादन बंद असले तरी आवश्यकता भासल्यास पुन्हा सुरू केले जाईल.  मात्र, नवीन व्हेरियंटविरोधात कोव्होव्हॅकस जास्त परिणामकारक आहे. त्यामुळे बुस्टर डोसाठी लवकरच परवानगी मिळेल.’

Back to top button