निरवांगीला नवीन वीज उपकेंद्र मंजूर : आ. भरणे | पुढारी

निरवांगीला नवीन वीज उपकेंद्र मंजूर : आ. भरणे

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा : खोरोची, निरवांगी, निमसाखर, दगडवाडी, सराफवाडी व घोरपडवाडी निरवांगी परिसरातील वीजग्राहकांची नवीन वीज उपकेंद्राची मागणी होती. अखेर निरवांगी येथे 10 एमव्हीए क्षमतेचे नवीन उपकेंद्र मंजूर  झाल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. उपकेंद्रामुळे खोरोची, निरवांगी, निमसाखर, दगडवाडी, सराफवाडी व घोरपडवाडी या गावांना योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे. यामुळे सततचे विद्युत रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

वीजग्राहकांचा अनावश्यक खर्च वाचणार आहे. तसेच नवीन वीजजोडणी तत्काळ मिळणार आहे. यासाठी कृषी धोरणांतर्गत जिल्हास्तरीय निधीतून मंजुरी दिली आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकरीवर्ग, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार आहे. उपकेंद्रामध्ये 5 एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविणार असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. निरवांगी येथील नवीन उपकेंद्राला मान्यता मिळाल्यानंतर परिसरातील शेतकर्‍यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले.

Back to top button