कामशेत : महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद | पुढारी

कामशेत : महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

कामशेत : पुणे-मुंबई महामार्गावर ताजे हद्दीत ट्रकचालकांना मारहाण करून लुटणारी टोळी जेरबंद करण्यात कामशेत पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चार जणांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख 35 हजार रुपये किमतीचे 14 मोबाइल, 690 रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. अनिल तुकाराम वाघमारे (वय 20), नवनाथ संतोष वाघमारे (वय 20), अनिल बारकु वाघमारे (वय 22), नवनाथ तुकाराम वाघमारे (वय 20, सर्व रा. मुंढावरे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, त्यांचे साथीदार मुस्ताफा, दत्ता पवार, मंग्या (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या परिसरात वारंवार अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याने लोणावळा उपविभाग सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी आरोपींना पकडण्यासाठी गस्त घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कामशेत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासोबत पथकाची विभागणी करुन घटनास्थळी व परिसरात आरोपींचा शोध घेण्यासाठी गस्त सुरू केली होती.

तसेच, पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार,  पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार समीर शेख, जितेंद्र दिक्षीत, रवींद्र राय, पोलिस नाईक प्रविण विरणक, सचिन निंबाळकर, हनुमंत वाळुंज, नितीन कळसाईत, बाळासाहेब गावडे, आशिष झगडे, शरद खाडे, रवींद्र राऊळ,अमोल ननवरे यांच्या पथकाने केली.

ट्रकचालकांना केली होती मारहाण

पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-मुंबई एक्सप्रेस वे-वर ताजे गावच्या हद्दीतील 27 डिसेंबर रोजी रात्री मुंबईकडे जाणारे दोन ट्रक चालक आपल्या ट्रकमधील हवा चेककरत असताना आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतला होता.

Back to top button