फुरसुंगी पाणी योजनेची शिवतारे यांच्याकडून पाहणी | पुढारी

फुरसुंगी पाणी योजनेची शिवतारे यांच्याकडून पाहणी

फुरसुंगी : फुरसुंगी, उरुळी देवाची पाणी योजनेच्या कामाचा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. राज्य सरकारने या योजनेला नुकताच 24 कोटी रुपयांचा वाढीव निधी दिल्याची माहिती या वेळी शिवतारे यांनी दिली. बैठकीनंतर त्यांनी योजनेच्या कामाची पाहाणी केली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता वैशाली औटी, कार्यकारी अभियंता मनीष पवार, उपअभियंता अनिल पवार, बाळासाहेब हरपळे, भानुदास मोडक, राजीव भाडळे, भाजपचे धनंजय कामठे, सुभाष मेमाणे, सविता ढवळे, अशोक हरपळे, रूपेश मोरे, गणेश हरपळे, गणेश कामठे, राहुल पवार, पंकज भारती, अविनाश हरपळे, अक्षय पवार आदी बैठकीला उपस्थित होते.

कचरा डेपोमुळे फुरसुंगी, उरुळी देवाची गावांतील जलस्रोत दूषित झाल्यामुळे येथील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. ही पाणी योजना या गावांसाठी जलसंजीवनी ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने या योजनेचे काम पूर्ण करून येथील पाणीप्रश्न कायमचा सोडविण्याची मागणी बाळासाहेब हरपळे यांनी केली आहे.

Back to top button