पुणे : पासवर्ड बदलून पाच लाख लंपास | पुढारी

पुणे : पासवर्ड बदलून पाच लाख लंपास

पुणे; पुढारी वृत्तसेवा : इंटरनेट बँकिंगसाठी असलेला पासवर्ड परस्पर बदलून त्याआधारे तब्बल 4 लाख 74 हजारांची फसवणूक करणार्‍या अज्ञात मोबाईलधारकावर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समृद्धी दिलीप हरिश्चंद्र (रा. सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे राहणार्‍या एका 26 वर्षीय तरुणीस अज्ञात आरोपीने फोन करून तिचे ग्राहक मनोहर मंजुनाथ राव यांनी ओटीपी सांगितला नसतानाही आरोपीने इंटरनेट बँकिंगचा पासवर्डचा बदल करून तिचे क्लायंट मनोहर राव यांची एकूण चार लाख 74 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Back to top button