पुणे : विद्यापीठ परिसरात विद्यार्थिनीचा विनयभंग

पुणे : विद्यापीठ परिसरात विद्यार्थिनीचा विनयभंग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या विद्यार्थिनीला अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी, चतुःश्रुंगी पोलिसांनी दीपक सौदे नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका 22 वर्षीय विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री बाराच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अ‍ॅल्युमिनी हॉलच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिच्या मित्रासोबत येथील अ‍ॅल्युमिनी हॉलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर 31 डिसेंबरच्या रात्री गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी सौदे तेथे आला. त्याने तरुणीला काही कारण नसताना तू कोणत्या डिपार्टमेंटची आहे, एवढ्या उशिरा काय करता, असे बोलून अश्लील शिवीगाळ केली. तसेच, पोलिसाची गाडी बोलावून आतमध्ये टाकण्याची धमकी देऊन तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news