पुणे : दहशत पसरविणार्‍या दोघांना बेड्या

पुणे : दहशत पसरविणार्‍या दोघांना बेड्या
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोयत्याच्या धाकाने नाना पेठ परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या आणखी दोघांना युनिट-1 ने अटक केली. त्यांच्याकडून कोयता, पालघन, सुरा असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. मयूर दत्तात्रय थोरात (वय 23, रा. नाना पेठ) आणि सुजल राजेश टापरे (वय 19, दोघेही रा. नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी गगन मिशन, अमन युसूफ खान (दोघेही रा. नाना पेठ), अरसलन तांबोळी (रा. रविवार पेठ), मंगेश चव्हाण (रा. रविवार पेठ), गणेश प्रकाश पवार (रा. रविवार पेठ) यांना अटक केली आहे. या आधी पाच जणांच्या टोळीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नवावाडा परिसरात घडली होती. टोळीने हातात कोयते आणि सुरा घेऊन नाना पेठेतील नवावाडा परिसरात राडा घातला होता. कोयते नाचवत आरडाओरड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी गुन्ह्याचा समांतर तपास युनिट-1 करीत होते.

कोयता गँगमधील दोघे आरोपी नारायण पेठेतील मंदिरालगत लपल्याची माहिती पोलिस अंमलदार अजय थोरात आणि नीलेश साबळे यांना मिळाली. पथकाने सापळा रचून मयूर व सुजल याच्यासह अल्पवयीनाला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलिस अंमलदार अजय थोरात, नीलेश साबळे, दत्ता सोनवणे, विठ्ठल साळुंखे, तुषार माळवदकर, रुक्साना नदाफ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news