पुणे शहरासह उपनगरांत बत्तीगुल; सिंहगड रोड, वडगाव, हिंगणे, धायरी परिसरातील नागरिकांची गैरसोय

पुणे शहरासह उपनगरांत बत्तीगुल; सिंहगड रोड, वडगाव, हिंगणे, धायरी परिसरातील नागरिकांची गैरसोय
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने पुकारलेल्या संप काळात पुणे शहरात प्रामुख्याने सिंहगड रोड, वडगाव, हिंगणे, धायरी या परिसरात पहाटे तीनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. एकामागे
एक तांत्रिक बिघाड होत गेल्याने अभिरुची, लिमयेनगर, प्रयाग या तीन उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी, सुमारे
30 हजार वीजग्राहकांची मोठी गैरसोय झाली.

गंभीर बिघाड झाल्याने कार्यकारी अभियंता मनीष सूर्यवंशी व केशव काळूमाळी यांनी कंत्राटदार एजन्सीच्या कर्मचार्‍यांच्या सहकार्याने बिघाड शोधणे व दुरुस्तीस सुरुवात केली. महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांनी भेट देऊन दुरुस्ती कामांची पाहणी केली. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

तसेच, पुणे शहरातील शिवणे, उत्तमनगर, वाकड, सांगवीमधील काही परिसर, सूस रोड, म्हाळुंगे, पाषाण, धनकवडी, आंबेगाव, कात्रज, गोकुळनगर, भिलारेवाडी, रामटेकडी, हडपसर गाडीतळ, बी.टी. कवडे रोड, टिंगरेनगर, मोहननगर, प्रेस कॉलनी, कोथरूडमधील शास्त्रीनगर आदी परिसरात विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. यातील बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत झाला असून, उर्वरित 30 टक्के भागांमध्ये दुरुस्ती कामांद्वारे रात्रीपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

यासोबतच चाकण एमआयडीसीमधील पाच वीजवाहिन्या, तसेच तळेगाव शहर, इंदोरी, वडगाव, सोमाटणे, नाणेकरवाडी, कुरळी, कडूस गावांना वीजपुरवठा करणार्‍या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला होता. मात्र, युद्धपातळीवर दुरुस्ती कामे करून सर्व वीजपुरवठा दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला.

जुन्नर, ओतूर गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. तो सायंकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. भोसरी एमआयडीसी सेक्टर 7, तसेच कुदळवाडी, देहूगाव, बोर्‍हाडेवाडी, चिखली, तसेच निगडीमधील ओटा स्कीम परिसरातील वीजपुरवठा विविध बिघाडांमुळे खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

या संपामध्ये कर्मचार्‍यांच्या 32 संघटना सहभागी झाल्यामुळे पुणे परिमंडलामधील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान होते. मंगळवारी मध्यरात्रीपासून सर्व कार्यकारी अभियंता नेमून दिलेल्या विभागांमध्ये निवडसूचीवरील कंत्राटदारांच्या कर्मचार्‍यांसह 'ऑन फिल्ड' होते. नियंत्रण कक्षाद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या प्राप्त माहितीनुसार, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे युद्धपातळीवरील काम सायंकाळपर्यंत सुरू होते.

आठ तास वीजपुरवठा खंडित
कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात बुधवारी जवळपास आठ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. सुखसागरनगर, गोकुळनगर, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, माउलीनगर आदी परिसरात जवळपास तब्बल 8 तासांपासून वीज गायब होती. त्याचबरोबर अधिकारी, कर्मचार्‍यांकडून शून्य प्रतिसाद मिळत आहे. महावितरणचे कर्मचारी संपावर गेल्याने फटका बसल्याचे बोलले जात आहे. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास गायब झालेली वीज सायंकाळी सहा वाजता काही भागांत सुरळीत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news