पुणे ; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे (वय 71) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी कोरेगाव पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
रणपिसे यांची कारकीर्द 1972 पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून झाली. ते 1978 ते 85 दरम्यान पुणे महापालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर ते 1985 ते 95 पर्वती विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तीन वेळा विधान परिषदेचे सदस्य होते. सध्या ते काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते होते. त्यांनी रामराज्य सहकारी बँक व श्री रामराज्य शिक्षण संस्थेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला होता.