पिंपरी : मोलकरणीने चोरली अंगठी | पुढारी

पिंपरी : मोलकरणीने चोरली अंगठी

पिंपरी : घरात काम करणार्‍या मोलकरणीने बेडरूममधून दोन लाख नऊ हजार 28 रुपये किमतीची अंगठी चोरली. ही घटना 31 डिसेंबर रोजी सकाळी रहाटणी येथे घडली. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोलकरीण महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने 31 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घरातील स्वच्छता करण्याच्या बहाण्याने घरातील दोन लाख नऊ हजार 28 रुपये किमतीची अंगठी चोरली. त्यानंतर अंगठीचे नुकसान केले. त्यानंतर 2 जानेवारी रोजी फिर्यादी यांच्या सोसायटीच्या गेटच्या आत अंगठी फेकून दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

 

Back to top button