तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी आणि जवळचा सहकारी गमावला: अजित पवार

तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी आणि जवळचा सहकारी गमावला: अजित पवार

पुणे : चिंचवड मतदारसंघाचे आमदार आणि भाजप नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा एक झुंजार लोकप्रतिनिधी आणि जवळचा सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी नेहमी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. त्यांनी राजकीय, सामाजिक जीवनात केलेले काम कायम सर्वांच्या स्मरणात राहील. जगताप यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडणारा धडाडीचा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी तडफेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची आणि जवळच्या सहकाऱ्याची उणीव कायम जाणवेल. त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात केलेले काम पिंपरी-चिंचवड परिसरातील जनता कधीही विसरु शकणार नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news