नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर ते आमदार; जाणून घ्या लक्ष्मण जगताप यांची थक्क करणारी राजकीय कारकीर्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. शेतकऱ्याचा मुलगा ते आमदार अशी कारकीर्द त्यांची राहिली. आमदार जगताप यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६३ रोजी पिंपळे गुरव येथे झाला. त्यांची एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरु झालेला राजकीय प्रवास नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषद सदस्य, विधानसभा आमदारकी पर्यंत राहिला.

1.आमदार लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षापासून सुरू झाली होती.

2. १९८६मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत ते प्रथम नगरसेवक निवडून आले.‌ १९९२, १९९७ आणि २००२ निवडून येत सलग २० वर्षे नगरसेवक म्हणून पिंपळे गुरवचे लोकप्रतिनिधीत्व केले.

3. १९९३-९४ मध्ये ते पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळवून देण्यात काँग्रेसचे तत्कालीन मंत्री अनंत थोपटे यांचा मोलाचा वाटा होता.

4. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. खासदार शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती.

5. १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या दरम्यान त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले. त्यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख निर्माण झाली.

6. महापौर झाल्यानंतर त्यांनी २००३ मध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्षपद भूषविले.

7. २००४ मध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून पुणे जागेसाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्यावर बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळविला.

8. २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होती. या आघाडीच्या जागा वाटपात चिंचवड मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला होता. त्यामुळे बंडखोरी करत लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली व विजय खेचून आणला. विजयानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसशीच संलग्न राहिले.

9. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी न स्विकारता त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. जगताप यांनी शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

10. २०१४ ची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढवून विजय मिळवला. आमदार जगताप यांनी २०१६ मध्ये पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष पद भूषविले.

11. आमदार जगताप यांच्या शहराध्यक्षपदाच्या काळात २०१७ ची महापालिका निवडणूक आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. एकूण १२८ पैकी ७७ नगरसेवक निवडून आणत पिंपरी चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली.

12. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आमदार जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news