पिंपरी : कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | पुढारी

पिंपरी : कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  कळंब (ता. आंबेगाव) येथे पुणे-नाशिक रस्त्यावरील कळंब बायपासवर अज्ञात कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सुभाष रामदास भगत यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर असलेले कपिल संजय भगत, दशरथ हरिभाऊ भगत हे जखमी झाले आहेत. दशरथ भगत (रा. कोळवाडी, घोडेगाव ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दशरथ भगत हे पुतण्या कपिल, चुलतभाऊ सुभाष यांच्यासोबत एम.एच 14 एफ.डब्ल्यू 8966 या दुचाकीवर कळंब बायपास रस्त्यावरून नारायणगावकडे  जात होते.  कपिल हा गाडी चालवत होता. त्यावेळी नाशिककडून पुण्याकडे येणार्‍या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातात कपिल व दशरथ हे दोघे गंभीर जखमी झाले होते. सुभाष यांचा उजवा पाय फ—ॅक्चर होऊन जोरदार मार लागल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी सुभाषला तपासून तो उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी अज्ञात कारचालकावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस जवान राजेंद्र हिले तपास करत आहेत.

Back to top button