पिंपरी : कांद्याची आवक घटली; दर स्थिर | पुढारी

पिंपरी : कांद्याची आवक घटली; दर स्थिर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील मोशी उपबाजार, पिंपरी, चिंचवड व आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये गेल्या आठवड्यापेक्षा कांद्याची आवक घटली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सव्वा दोनशे क्विंटलची घट झाली. तर बटाट्याची आवक 309 क्विंटलने वाढली आहे. मात्र इतर भाजीपाल्यासह कांदा बटाट्याचे दरही स्थिर असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. मोशी उपबाजारात गेल्या आठवड्यात 507 क्विंटल झालेली कांद्याची आवक या आठवड्यात 283 क्विंटल होती. तर बटाट्याची आवक 722 क्विंटल झाली असून, गेल्या आठवड्यात 417 क्विंटल आवक होती.

भेंडीची आवक 38 क्विंटल एवढी झाली असून, गेल्या आठवड्यात 20 क्विंटल एवढी आवक होती. किमान 18 क्विंटने आवक घटली आहे. तसेच काकडीची आवक 197 क्विंटल झाली असून गेल्या आठवड्यात 32 क्विंटल आवक होती. गेल्या आठवड्यापेक्षा 165 क्विंटने आवक वाढली आहे. आणि गवारची आवक गेल्या आठवड्याप्रमाणे केवळ दोन क्विंटल झाली. घाउक बाजारात काकडी 25 रूपये प्रतिकिलो, भेंडी 28 रूपये तर गवार 40 रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. टोमॅटो, कांदा 8 रूपये व बटाट्याची 11 रूपये प्रति किलो दराने विक्री झाली. मटार 28 रूपये दराने विक्री आहे. पालेभाजांची 44,410 गड्डी, तर फळे 296 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 3,009 क्विंटल एवढी आवक झाली आहे.

पिंपरी मंडईतील

पालेभाज्यांचे किरकोळ भाव :
पालेभाज्या दर (प्रति पेंडी) :
मेथी 15, कोथिंबीर 15, कांदापात 20,
शेपू 15, पुदिना 10, मुळा 20
चुका 15, पालक 10
फळभाज्यांचे किलोचे भाव :
कांदा 20-25, बटाटा 25-30, लसूण 40-50, आले 50-60, काकडी 50, भेंडी 60, गवार 90- 100, गावरान गवार 120, टोमॅटो 20-30,दोडका 40, हिरवी मिरची, 50-60, दुधी भोपळा 40, लाल भोपळा 40, कारली 50, वांगी 50, भरीताची वांगी 40, तोंडली 50, पडवळ 40, फ्लॉवर 40, कोबी 30, शेवगा 100-120, गाजर 40-50, ढोबळी मिरची 50, वाटाणा 50 ते 60, बिन्स 60.

 

Back to top button