पुणे : खवय्यांचा मांसाहारावर ताव; मासळी, मटण, चिकनच्या दुकानांवर गर्दी | पुढारी

पुणे : खवय्यांचा मांसाहारावर ताव; मासळी, मटण, चिकनच्या दुकानांवर गर्दी

पुणे : थर्टी फर्स्टनंतर 1 तारखेलाच रविवार आल्याने अनेकांनी मांसाहारावर ताव मारला. मासळी बाजारासह मटण, चिकनच्या दुकानांवर खरेदीसाठी रविवारीही चांगली गर्दी झाली होती. सुरमई, पापलेट, कोळंबी, रावस, हलवा, ओले बोंबील या मासळीचे वाढलेले दर टिकून होते. चिकनच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत किलोमागे 20 रुपये, तर गावरान आणि इंग्लिश अंड्यांच्या शेकडा दरात 5 ते 10 रुपयांची वाढ झाली होती, तर मटणाचे दर स्थिर होते.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 1) खोल समुद्रातील मासळीची 10 ते 15 टन, खाडीची 400 ते 500 किलो, तर नदीच्या मासळीची 400 ते 500 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : 1400-1500, मोठे : 1500, मध्यम : 1200-1400, लहान : 800-900, भिला : 700, हलवा : 600-700, सुरमई : 440-550, रावस : 600-700, घोळ : 700-800, करली : 320-360, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 400, पाला : 1000- 1200, वाम : 700-800, ओले बोंबील : 280-260. कोळंबी : 200-550, जम्बो प्रॉन्स : 1300-1400, किंग प्रॉन्स : 700-750, लॉबस्टर : 1800- 2000, मोरी : 240-320, मांदेली : 100-140, राणीमासा : 160-240, खेकडे : 280-360, चिंबोर्‍या : 480-600. खाडीची मासळी : सौंदाळे : 280-360, खापी : 200-240, नगली : 550-600, तांबोशी : 360-440, पालू : 200-240, लेपा : 200-240, बांगडा : 140-180, शेवटे : 200-240, पेडवी : 100-120, बेळुंजी : 120-160, खुबे : 120-140, तिसर्‍या – 240-280, तारली : 120-160. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 160-180, मरळ : 400-440, शिवडा : 180-220, खवली : 200-240, आम्ळी : 120-160, खेकडे : 400-440, वाम : 500-550. मटण : 700, कलेजी : 740, चिकन : 220, लेगपीस : 270, जिवंत कोंबडी : 150, बोनलेस : 320. अंडी : गावरान (शेकडा) 950, डझन 126, प्रतिनग 10.50. इंग्लिश (शेकडा) 593, डझन 78, प्रतिनग 6.50.

Back to top button