बारामतीत अजित पवारांचा घरासमोर पुतळा जाळून निषेध

बारामतीत अजित पवारांचा घरासमोर पुतळा जाळून निषेध
Published on

बारामती; पुढारी वृत्तसेवा : नागपूर विधी मंडळ अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख केल्यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोमवारी भाजप व शिवधर्म फौंडेशनने पवार यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांचा पुतळा जाळत आंदोलन केले. बारामतीतल्या भाजप व शिवधर्मच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांचा पुतळा जाळला.

यावेळी अजित पवार हाय हाय, धरणवीर अजित पवार.. अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपच्या वतीने भिगवण चौकात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र पोलिसांना गुंगारा देत अचानक कार्यकर्ते अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर एकत्र आले आणि जोरदार घोषणाबाजी करत पवार यांच्या पुतळ्याचे दहन केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news