पुणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ब्रेसलेट चोरले | पुढारी

पुणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ब्रेसलेट चोरले

पुणे : नातेवाइकाच्या लग्नसमारंभाहून परतताना दुचाकीस्वार चोरट्यांनी एकाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून त्यांच्या हातातील 45 हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. ही घटना 30 डिसेंबरला रात्री सव्वा अकराच्या सुमारास धानोरी खदानसमोर घडली.
या प्रकरणी 59 वर्षीय नागरिकाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी हे 30 डिसेंबरला नातेवाइकाच्या लग्नसमारंभानंतर दुचाकीवरून घरी चालले होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने धानोरी खदान परिसरात अडविले. त्यानंतर त्यांच्या हातातील 45 हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट हिसकावून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गेंड तपास करीत आहेत.

Back to top button