येरवडा भागात बांधकामांवर हातोडा | पुढारी

येरवडा भागात बांधकामांवर हातोडा

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : येरवडा परिसरातील शांती रक्षक सोसायटी, गुंजन चौक, नगर रोड येरवडा, आदर्श कॉलनी, कस्तुरबा हाउसिंग सोसायटी, टिंगरेनगर, एअरपोर्ट रोड परिसरात अनधिकृत बांधकाम पत्राशेडवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली. परिसरातील एकूण 3350 चौरस फूट क्षेत्रफळावर ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत पत्राशेड, वीट बांधकाम यावर ही करवाई करण्यात आली.

कारवाई झोन 4 चे उपअभियंता एकनाथ गाडेकर, कनिष्ठ अभियंता कश्यप वानखेडे, सहायक पराग गोरे, 10 बिगारी, एक इलेक्ट्रिशियन, एक जेसीबी, एक ब्रेकर मशिन आणि एका गॅसकटरच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या वेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Back to top button