पुणे : अमली पदार्थांची तस्करी करणार्‍याला अटक | पुढारी

पुणे : अमली पदार्थांची तस्करी करणार्‍याला अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अमली पदार्थ विरोधी पथकाने बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ तस्करी करणार्‍याला बुधवारी (दि. 28) रात्री उशिरा जेरबंद करण्यात आले. अमली पदार्थ विरोधी पथक 2 मधील पोलिस निरीक्षक सुनील थोपटे व अंमलदार कारवाई कामी पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंमलदार योगेश मांढरे व प्रशांत बोमादांडी यांना याबाबत माहिती मिळाली.

त्या माहितीनुसार त्यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीत सापळा रचून धीरज राजेश कांबळे (वय 22, वर्षे राहणार, सर्व्हे.नं.12, गजराज मित्र मंडळ जवळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एमडी हा 10 लाख 76 हजार किमतीचा 53.08ग्रॅम अमली पदार्थ सापडला. त्याच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button