पुणे शहराच्या विविध भागांतून विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी पीएमपीच्या 90 बस | पुढारी

पुणे शहराच्या विविध भागांतून विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी पीएमपीच्या 90 बस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जाण्याकरिता पीएमपी प्रशासनाने 90 बसचे नियोजन केले आहे. या गाड्या शहरातील विविध भागांतून सोडण्यात येतील, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाने दिली. पीएमपीकडून 1 जानेवारीला पुणे व पिंपरी-चिंचवड येथून या बस सोडण्यात येणार आहेत.

लोणीकंद कुस्ती मैदान येथून 40 बस, वढू फाटा (इनामदार हॉस्पिटल) ते वढूकरिता 5 बस, तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड ते कोरेगाव भीमापर्यंत 35 बस, अशा 80 मोफत (विनातिकीट) बसचे नियोजन आहे. 1 तारखेला सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबामाळ, फुलगाव शाळा ते पेरणे टोल नाक्यापर्यंत 140 बस व शिक्रापूर रोड (तोरणा हॉटेल) ते कोरेगाव भीमापर्यंत 115 बस आणि वढू फाटा ते वढूपर्यंत 25 बस, अशा एकूण 280 मोफत (विनातिकीट) बसचे नियोजन आहे.

या स्थानकांवरून बस
प पुणे स्टेशन मोलादिना बसस्थानक – 38 बस प मनपा भवन शिवाजीनगर बसस्थानक – 35 बस प दापोडी मंत्री निकेतन – 02 बस प ढोले पाटील रोड मनपा शाळा – 02 बस प अप्पर डेपो बसस्थानक – 04 बस प पिंपरी आंबेडकर चौक – 03 बस प भोसरी स्थानक – 04 प हडपसर डेपो – 02

सुरक्षेची तयारी पूर्ण….
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. त्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस दलाकडून सुरक्षेच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे. पुणे शहर पोलिस दल, पुणे ग्रामीण पोलिस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, पीएमपीएमएल, बार्टी, अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या समन्वय बैठका झाल्या आहेत.
विजयस्तंभ परिसरात सर्वत्र 240 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

तसेच, 5 स्पॉटर किट व्हॅन असणार आहेत. व्हिडिओ कॅमेरा व ड्रोनच्या माध्यमातून निगराणी करण्यात येणार आहे. यंदा पोलीस महासंचालक कार्यालयाकडून बाहेरून पोलीस अधिकारी, पोलीस अमलदार, होमगार्ड, एसआरपीएफ, रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स, असा बंदोबस्त असणार आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विजयस्तंभ अभिवादन बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलीस आयुक्त व पोलीस सहआयुक्तांनी प्रत्येक बंदोबस्त ठिकाणाला भेट देऊन सूचना दिल्या आहेत.

Back to top button