पारगाव : बिबट्याचा शेळ्या-मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला; शेळी- मेंढीचा मृत्यू

पारगाव : बिबट्याचा शेळ्या-मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला; शेळी- मेंढीचा मृत्यू
Published on
Updated on

पारगाव (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : वळती येथील शिंदे मळ्यात मेंढपाळाच्या शेळ्या – मेंढ्यांच्या वाड्यावर सलग दोन दिवस बिबट्याने हल्ला करून एक शेळी व मेंढीचा फडशा पाडला. शिंदे मळा, वळती परिसरात शेतकरी, मेंढपाळांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटना शनिवारी (दि.24 ) व रविवारी (दि.25) रात्री घडल्या.

वळती तेथे नरहरी श्रीपती शिंदे हे मेंढपाळ राहतात. त्यांच्याकडे शेळ्या- मेंढ्यांचा वाडा आहे. शनिवारी (दि. 24) रात्री बिबट्याने वाड्यात प्रवेश करून एका मेंढीला जागीच ठार केले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी रविवारी (दि.25) पुन्हा रात्री बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. सलग दोन रात्री शेळ्या- मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला झाल्याने मेंढपाळ नरहरी शिंदे हे भयभीत झाले आहेत. त्यांचे सुमारे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news