ज्या वर्षाचे घर असेल, त्या वर्षाचा कर आकारा; उंड्रीतील नागरिकांची पालिकेकडे मागणी | पुढारी

ज्या वर्षाचे घर असेल, त्या वर्षाचा कर आकारा; उंड्रीतील नागरिकांची पालिकेकडे मागणी

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष वसंत सुतार आणि राजेश कामठे यांनी उंड्री गाव कृती संघर्ष समितीच्या उपोषणकर्त्यांची सोमवारी भेट घेऊन चर्चा केली. उपोषणकर्त्यांनी सन 1997 मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना ज्या वर्षाचे घर, त्या वर्षाचा दर व नवीन मिळकतींना एक रुपया निवासी व दोन रुपये बिगर निवासीप्रमाणे कर लावला होता. त्याच पद्धतीने करआकारणी करावी, या मागणीचे निवेदन समितीने त्यांना देण्यात आले.

पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सोमवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यांशी संवाद साधला. दरम्यान, हिवाळी अधिवेशनामध्ये नव्याने समाविष्ट गावांमध्ये सुविधांचा दुष्काळ असला, तरी वाढीव कराने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जाचक कर आणि सुविधा याविषयी नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी रविवारी (दि. 25) उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी महापालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा केली. लवकरच याविषयावर चांगला निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी उपोषणकर्त्यांना दिले.

Back to top button