सासवड (ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : 'मागील महाविकास आघाडीचे सरकार हे महाराष्ट्राच्या हिताचे नव्हते, ते घालवण्यासाठी पहिल्या दोन महिन्यांतच मी उचल खाल्ली होती आणि भाजप-शिवसेनेचे सरकार यावे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात उठाव करायचे बीज मीच घातले होते,' असे माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी सांगितले.
शिवतारे यांचा वाढदिवस, अभीष्टचिंतन सोहळा नुकताच सासवड येथे पार पडला. त्या वेळी शिवतारे बोलत होते.
विजय शिवतारे म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 'नंदनवन'ला दोन महिने बसलो होतो, एकदा तर साडेचार तास चर्चा केली. त्यांना म्हणालो, हे महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही, हे सरकार तोडले पाहिजे आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चुकत आहेत, त्यांच्यावर दबाव आणा, महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना सरकार आले पाहिजे.'