पिंपरी : डीलरशिपच्या बहाण्याने फसवणूक | पुढारी

पिंपरी : डीलरशिपच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मद्य उत्पादक कंपनीची डीलरशिप देण्याच्या बहाण्याने तिघांनी मिळून एकाची 15 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट 2021 मध्ये मारुंजी येथे घडला. दत्तू सोमनाथ गवळी (53, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 23) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, करून कोरा (रा. पंजाब), रिमझिम मुखर्जी, अजिंक्य अनिल कासारे (वय 28, रा. नांदेड सिटी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी काया ब्लेंडर अँड डिस्टिलरी प्रा लि ही मद्य उत्पादक कंपनी स्वतःच्या मालकीची असल्याचे गवळी यांना सांगितले. या कंपनीची पुणे जिल्ह्यासाठी डीलरशिप गवळी यांना देतो, असे आमिष दाखवून त्यांना 15 लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर झालेल्या करारानुसार कोणत्याही मालाची डिलिव्हरी न देता 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button