मंचर बाजार समितीत कांद्याला उच्चांकी भाव; नवीन कांद्याची आवक सुरू | पुढारी

मंचर बाजार समितीत कांद्याला उच्चांकी भाव; नवीन कांद्याची आवक सुरू

मंचर; पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजार आवारात गुरुवारी (दि. 22) 4 हजार 500 क्विंटल कांद्याची आवक झाली. बाजार आवारात जुना कांद्यास 180 ते 255 रुपये प्रति 10 किलो असा बाजारभाव मिळाला. तसेच, बाजार आवारात नवीन कांदा आवक येण्यास सुरुवात झाल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक पी. एस. रोकडे यांनी दिली.

श्यामराव महादेव टाव्हरे यांच्या आडत गाळ्यावर विक्रीसाठी आणलेल्या संदीप मुरलीधर गुंड (रा. संगमनेर) या शेतकर्‍याच्या 37 पिशवी नवीन कांद्यास 10 किलोस 225 रुपये व शिवाजी रामचंद्र म्हसाडे (रा. निमगाव दावडी, ता. खेड) या शेतकर्‍याच्या नवीन गोळा कांद्यास 10 किलोस 230 रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. नवीन कांद्याची आवक वाढत असल्याने बाजारभाव चांगला मिळण्याची शक्यता कांदा व्यापारी वसंतराव थोरात आणि चंद्रकात थोरात यांनी सांगितले.

 

Back to top button